वनराई हे २३० एकर मध्ये फुलविलेले व जैवविविधतेने परिपूर्ण असे एक छोटंसं वन असेल. निसर्ग सहवासातच राहून आपली स्वतःची शेती किंवा शेतीपूरक व्यवसाय करण्याचे ज्यांचे स्वप्न आहे त्यांच्यासाठी 'वनराई' ही एक सुवर्णसंधी आहे. इथे तुम्ही राहण्याचा आनंद ही घेऊ शकता व त्याचसोबत फळझाडांची लागवड, आयुर्वेदिक वनस्पती, सेंद्रिय शेती, गोपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन, ऍग्रो टुरिझम इ. व्यवसाय करून हमखास उत्पन्नही मिळवू शकता.
आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात अधिकाधिक उत्त्पन्न घेण्याच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे आणि यामुळेच जैवविविधता, जमिनीची सुपीकता आणि पर्यायाने मानवी आरोग्यालाही धोका पोहचत आहे. ह्या वर रामबाण उपाय म्हणजे ' सेंद्रिय शेती'. संपूर्ण शेती ही नैसर्गिक पद्धतीचीच असेल. . .अधिक माहिती
शेतीतून हमखास उत्पन्न मिळविण्यासाठी फळझाडांची सुद्धा सेंद्रिय शेतीच्या योग्य प्रमाणात लागवड करून त्यांची निगा राखणे हे वनराईच्या संकल्पनेमागचे एक मुख्य उद्दिष्ट आहे. यातून अन्नप्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल व जवळील कुटुंबाना उदरनिर्वाहासाठी आणखी एक काम मिळेल. . .अधिक माहिती
कितीतरी रोगांवर इलाज म्हणून वापर होणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पतींची भारताने संपूर्ण जगाला देण दिली आहे आणि आता आपण स्वतःच काळाच्या ओघात ह्या वनस्पतींना विसरलो आहोत. वनराई मध्ये अश्या आयुर्वेदिक वनस्पतींची कमतरता नसेल कारण प्रत्येक प्लॉटवर आपण ह्या वनस्पतींच्या लागवडीसाठी. . . अधिक माहिती
अद्वितीय सुगंध असणारे भारतीय मसाले अजूनही जागतिक बाजार पेठेत वर्चस्व राखून आहेत तसेच त्यांचे जेवणातील व निसर्गचक्रातील महत्वही अनन्यसाधारण आहे. जैवविविधता जपण्याबरोबरच उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करणे हे वनराई चे एक प्रमुख ध्येय आहे. या मसाल्यांच्या वनस्पती लागवडीत ओवा, हिंग, दालचिनी, मोहरी, जायफळ, हळद यांसारख्या अनेक उपयोगी वनस्पतींची निगा राखली जाईल. . . अधिक माहिती
निसर्ग संवर्धन म्हणजे फक्त शेती करणे किंवा फळझाडे, आयुर्वेदिक वनस्पती व मसाले वनस्पती यांची लागवड करणे एवढेच नसून जैवविविधता टिकविण्यासाठी पशु व पक्षांची सुद्धा योग्य प्रमाणात उपलब्धता असणे गरजेचे आहे. वनराई मध्ये शेतीपूरक अनेक व्यवसायाच्या संधी उपलब्ध असतील ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी आवश्यक ती खते जागेवरच निर्माण केली जातील. . . अधिक माहिती
निसर्गसंवर्धन करणे हा तर आमचा मूळ हेतू आहेच परंतु तुम्ही प्लॉट खरेदी करण्यासाठी करत असलेल्या गुंतवणुकीवर आजीवन नियमित उत्पन्न मिळवून देणे हे सुद्धा आम्ही आमचे कर्तव्य समजतो आणि म्हणूनच तुमच्या प्लॉट वरील काही भाग हा आम्ही व्यावसायिक शेतीसाठी वापरात आणणार आहोत. यातून तुम्हाला तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळत राहील आणि आम्हाला निसर्गवाढीचे समाधान मिळत राहील. . . अधिक माहिती
प्रथम निसर्ग संवर्धन आणि मग आपले घर
वनराई म्हणजे नुसते 'फार्म हाऊस' उभारण्यासाठी उपलब्ध केलेले प्लॉटिंग नसून ते निसर्ग संवर्धन व निसर्ग वाढीचे एक आदर्श उदाहरण असेल. कारण आमचे निसर्ग वाढीचे उद्दिष्ट आणि त्यासाठी अपार मेहनत घेण्याची आमची तयारी यातून ही कल्पना अस्तित्वात येत आहे.
आम्ही तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस उभारण्यासाठी कमीत कमी १/२ एकर चे प्लॉट्स उपलब्ध करून देऊ ज्या मध्ये आम्ही ९० : १० असे प्रमाण राखून ठेवले आहे. ९०% वनराई व १०% बांधकाम.
तुमच्या फार्म हाऊसच्या उभारणी अगोदरच तिथे फुललेली सेंद्रिय शेती, टुमदार फळझाडे, आयुर्वेदिक वनस्पती, पक्ष्यांची घरटी इ. गोष्टीने सज्ज असा तुमचा प्लॉट तुम्हाला निसर्ग सहवासाचा अतुलनीय आनंद देण्यासाठी तयार असेल. ह्या साठी तुम्ही स्वतः येऊन शेती किंवा निसर्ग वाढ केलीच पाहिजे असे नाही कारण तुमच्या प्लॉट वर होणारी सुंदर अशी निसर्ग वाढ ही आमची जबाबदारी राहील. तुम्ही फक्त एकच करायचे, प्लॉट खरेदी करून वेळोवेळी येऊन आम्ही करत असलेल्या कामाला प्रोत्साहन द्यायचे.
आजच्या या व्यवहारीक जगात पैसे देऊन सुद्धा लोकांची फसवणूक केली जाते पण वनराई मध्ये तुम्ही आज साठी गुंतवणूक करत नसून ती तुम्ही स्वतःला व तुमच्या येणाऱ्या पिढीला दिलेली एक समाधानकारक भेट असेल.
२३० एकर मधील भव्य असा 'फार्महाऊस सह शेती' प्रकारातील एक विश्वसनीय प्रकल्प.
पुण्यापासून फक्त ७५ कि.मी. अंतरावर भोर - भाटघर धरणाच्या जवळ.
शेतीसाठी मुबलक पाणी व आवश्यक नैसर्गिक खतांची उपलब्धता.
शेती योग्य सुपीक माती, आवश्यक वाहतूक व्यवस्था, राहण्यायोग्य नैसर्गिक वातावरण ह्या मूलभूत गरजांची पूर्तता.
तज्ञ मार्गदर्शक, अनुभवी शेतकरी, निसर्ग प्रेमींची कार्यक्षम फौज व सोबतीला स्वतः निसर्गाची साथ
सेंद्रिय शेती, फळझाडे व आयुर्वेदिक तसेच भारतीय वनस्पतींची शास्त्रीय पद्धतीने लागवड व निगा.
प्रत्येकालाच असे वाटते की आपलेही एक सुंदर, हिरवळीने नटलेले, निसर्गाच्या कुशीत, टुमदार असे फार्म हाऊस असावे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून उसंत काढून मोकळा श्वास घेण्यासाठी आपलीही हक्काची जागा असावी असे तुम्हाला वाटते का? फार्म हाऊसच्या स्वप्नासोबतच तिथेच शेती किंवा शेती पूरक व्यवसाय करता आला तर...तर सोन्याहून पिवळेच ना...'वनराई' घेऊन आली आहे एक अशी योजना जिथे तुमची ही दोन्ही स्वप्ने विश्वासाने पूर्ण होतील.